पंकजा मुंडे खासदार होणार? भाजपमध्ये हालचाली सुरू Pankaja Mundhe MP

बीड: लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना संसदेत पाठवण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत. राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना राज्यसभेत पाठवण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडे केली आहे. सकाळ वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे. भाजपने राज्यसभेत पाठवले, तर पंकजा मुंडेंची खासदारकीची इच्छा पूर्ण होऊ शकते.

पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचा चेहरा आहेत. त्यांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडे केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभेला पराभव, राज्यसभेवर वर्णी? बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यावेळी प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. हा पराभव पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर काही समर्थकांनी आत्महत्याही केल्या.

टिप्पण्या